| -: गणेशोत्सव 2009 :- |
|
|
लालबागचा राजा हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीला लोकांकडून मिळालेले नाव आहे. मंडळाने गणेशोत्सव 2009 च्या तयारीला जून महिन्यातच सुरुवात केली आहे. भाविकांना लालबागचा राजाचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशिल असते. गणेशोत्सव 2009 साठी सुमारे 1800 सहकारी सभासदांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या बरोबरच सुमारे 3000 स्वयंसेवक लालबागच्या राजाच्या भाविकांच्या मदतीसाठी तयार आहेत. आपाद्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. |
|
गणेशोत्सव 2009 साठी व्यवस्था
यावर्षी लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी वा फेडण्यासाठी आलेल्या भाविकांची नवसाची रांग ग.द.आंबेकर मार्गावरील ओमशांती डेव्हलपर्सच्या आवारातून लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड - भारतमाता सिनेमा - साईबाबा पथ - ग.द.आंबेकर - अभ्युदय नगर या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणाऱयांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.
लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱया भाविकांची `मुख दर्शन रांग' गणेशोत्सव 2008 सारखीच असेल. ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा) मार्गे श्रीं च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणाऱया भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे चिंचपोकळी स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.
भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी दोन्ही रांगांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहेत.
विसर्जन
गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2009 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ठिक 11 वाजता लालबागच्या राजाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक लालबाग मार्केट येथून निघेल. मिरवणूकीच्या पूर्वतयारी साठी लालबागच्या राजाची नवसाची रांग बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2009 रोजी सकाळी ठिक 7 वाजता बंद करण्यात येईल. तसेच लालबागच्या राजाची मुख दर्शनाची रांग गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2009 रोजी रात्रौ ठिक 12 वाजता बंद करण्यात येईल.
बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2009 रोजी सकाळी 9 वाजता गणरायाची आरती होऊन ठिक 11 वाजता लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघेल. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचेल.
watch my some new post about ganpati bappa -> www.jaibapasitaram.blogspot.com
watch full bal ganesh movie for free -> www.jaibapasitaram.blogspot.com |
|
0 Feedback:
Post a Comment